top of page
WhatsApp Image 2025-03-29 at 22.30.40_d28697e3.jpg

बेंगळुरूतील सर्व नाट्य रसिकांना "जागतिक रंगभूमी दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा 🎭या निमित्ताने बेंगळुरूमधील नाट्य रसिकांसाठी मित्रमंडळ खास २ दिवसीय नाट्य शिबीर घेऊन येत आहे 🎊या शिबिराची अधिक माहिती लवकरच आपल्याला कळेल. तोपर्यंत मित्रमंडळाच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंट्सला फॉलो करा..

गणेशोत्सव हा आपल्या मराठमोळ्या लोकांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. गणेशोत्सव जवळ आला की चाहूल लागते ती बाप्पांच्या स्वागताची आणि सजावटीची. आपली ही परंपरा गेले अनेक वर्ष मित्रमंडळाने अविरतपणे सुरू ठेवली आहे. ह्या प्रथेचाच एक भाग म्हणजे आपली मराठी कला, साहित्य जोपासणे व त्याची वृद्धी करणे. आपल्या मातीपासून दूर असलो तरीही मनाने मात्र आपण आपल्या मातीशी जोडलेलेच आहोत. म्हणूनच या दोन्ही गोष्टींची सांगड घालून मित्रमंडळ बेंगळुरूने गणेशोत्सवात स्मरणिका प्रकाशित करण्याची परंपरा सुरु केली, जी आजही अविरतपणे चालूच आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही मित्रमंडळ वार्षिक स्मरणिकेसाठी स्वलिखित साहित्य पाठवण्याचे आवाहन करीत आहे. मित्रमंडळाचे सभासद त्यांचे स्वलिखित साहित्य आमच्यापर्यंत ई-मेल द्वारे अथवा आमच्या कार्यकर्त्यांना संपर्क साधून पाठवू शकतात.त्यासाठीच्या काही अटी पुढीलप्रमाणे: - आपले मित्रमंडळाचे सभासदत्व असावे. सभासदत्व संपत आले असल्यास ते रिन्यू करून आपले साहित्य पाठवावे.- साहित्य मराठीत व स्वलिखित असावे.- साहित्य पूर्व-प्रकाशित नसावे.- शब्दमर्यादा ७५० शब्द- १६ वर्षांखालील मुलांना इंग्रजी साहित्य ही पाठविता येईल.- साहित्यप्रकार हा लेख, कथा, कविता, आरोग्यविषयक माहिती,प्रवासवर्णन,मुलाखत, चित्र, शब्दकोडे, विनोद, व्यक्तिचित्रण इत्यादी पैकी असावे.- साहित्य Google मराठीत टाईप करुन Microsoft Word File Format मध्येच पाठवावे.- साहित्य कृपया ३१ मे २०२५ पर्यंत पाठवावे.- वेळेत आलेल्या साहित्याच्या प्रकाशनासंबंधीचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल याची कृपया नोंद घ्यावी.आपण स्मरणिकेसाठी साहित्य mmsmaranika2025@gmail.com या आमच्या ईमेल आयडीवर ३१ मे २०२५ पर्यंत पाठवू शकता.अधिक माहितीसाठी कृपया खालील कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा.

१. प्रज्ञा बक्षी

        ९७४०००८३६२

२. मानसी फडके

         ९९८६५३४१९७

 ३.अश्विनी भालेराव-कुलकर्णी 
         ९६२०५८२४४२

 

WhatsApp Image 2025-03-29 at 22.31.16_a803485d.jpg
  • Mitramandal
  • YouTube
  • Twitter
  • Instagram

© 2024 Mitramandal Bengaluru

bottom of page